Marathi Ukhane – मराठी उखाणे (लग्नासाठी) Male/Female 2024

तुम्ही मराठी उखाणे शोधत आहात का? तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात इथे तुम्हाला लग्न असो या इतर समारंभ सर्वांसाठी उखाणे मिळतील. उखाणे घ्यायची ही महाराष्ट्रातील गमतीदार व मजेशीर परंपरा आहे.

विविध समारंभात नाव घे म्हणजेच उखाणे घेत असतात विशेषतः लग्न काळात नव वधु व वर या दोघांनाही नातेवाईकांकढून नाव घे म्हणजेच उखाणे घेण्यासाठी आग्रह केला जातो त्यामुळेच जर का तुमचे नुकतेच लग्न ठरले असतील तर आधीच उखाणे जाणून घ्या, चला तर जाणून घेवूया काही सोपे, मजेदार लक्षात राहतील असे उखाणे. या व्यतिरिक्त आमच्या Birthday Wishes Marathi आणि Attitude Shayari या ब्लॉग ला देखील भेट द्या.

Marathi Ukhane

Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

Marathi Ukhane for Female (नवरीसाठी)

आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून,
___रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून.
आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा,
___रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा.
चाफा बोलेना, चाफा चालेना,
___च माझ्याशिवाय, पानच हलेना.
 गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
___रावांचे नाव घेते___ची सून.
संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
___रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन. 
उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात___आणि___ची जोडी आहे जबरदस्त.
आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे,
___रावांसाठी, सोडून आले मी सारे. 
तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी,
___रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी. 
संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,
___रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष. 
नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,
___रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल. 
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
___रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.
मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार,
___रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.

अजून वाचा >> Marathi Ukhane for Female (नवरीसाठी)

Marathi Ukhane for Male (नवरदेवासाठी)

एक होती चिऊ आणि एक होता काऊ,
___च नाव घेतो, डोकं नका खाऊ.
ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल,
___च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल.
आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा,
___च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.
प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा,
शोधून नाही सापडणार, ___सारखा हिरा.
हिरव्यागार मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
___ला पाहून, पडली माझी विकेट.
सोन्याच्या कपावर, चांदीची बशी,
___समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
___च्या रूपाने, झालो मी बेभान.
आंब्याला आहे, फळांच्या राजाचा मान,
___चे नाव घेतो, ऐका देऊन कान.
चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ,
___चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ.
कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव,
___चे नाव घेतो, बंद करा टिव टिव.
डाळीत डाळ, तुरीची डाळ,
___च्या मांडीवर खेळवीन, एक वर्षात बाळ.
उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ.

अजून वाचा >> Modern मराठी उखाणे

गृह प्रवेश करतानाचे उखाणे

सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,
___रावांचे नाव घेते साथ जन्मासाठी.
इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात,
___रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते आत. 
सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात,
___रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
प्रेमळ लोकांना आवडते, लव्ह शायरी,
___रावांसोबत ओलांडते, मी घराची पायरी. 
नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले,
___रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.
जमले आहेत सगळे___यांच्या दारात,
___रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात.
नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड,
___च नाव घेतो, आता तरी वाट सोड.
रस्ता अडवायला, जमल्या सगळ्या बहिणी,
___ला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी?
त्यांचा नि माझा संसार होईल सुकर,
जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.
सुखी ठेवोत सर्वाना, ब्रम्हा, विष्णू, आणि महेश,
___रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
लग्न झाले आता, आमची बहरू दे संसारवेल,
___रावांचे नाव घेते, वाजवून ___च्या घराची बेल.
हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट,
___रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
___ची लेक झाली, ___ची सून,
___च नाव घेते, गृहप्रवेश करून.
शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात,
___रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात.
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात,
___रावांचे नाव घेते, ___च्या दारात.
जमले आहेत सगळे, ___च्या दारात,
___रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.
माझ्या___चा चेहरा, आहे खूपच हसरा,
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये विसरा.
खेळत होतो PUBG , आला ब्लू झोन,
___चं नाव घेतो, शोधून सेफ झोन.
पाण्यात घागर बुडताना, आवाज येतो बुडबुड,
___आणि माझ्या Life मध्ये, नको कुणाची लुडबुड.
बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला,
___च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?
तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल,
___माझी आहे, खरंच कित्ती ब्युटीफुल.
रोज___म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस,
मग उखाणा घेताना___, कशाला गं खोटे खोटे लाजतेस?
Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले,
___आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले.
सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर,
___आहे, माझ्या Life चा Server.
दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते,
___च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते.
यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली,
___आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली.
लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा,
तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?
उखाणा घेते मी, खूपच Easy,
___राव असतात नेहमी, कामामध्ये Busy.
ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
___तू मला, सुपरवूमन वाटतेस.
माझ्या Life मध्ये,___भेटली Luckily,
कोणी काही बोलले तर, करते माझी वकिली.
माझं नाव घेताना___करते Blush,
Life मधले Tensions सारे, होणार आता Flush.
कॅन्टीन, हॉटेलला ठोकला मी राम राम,
___च्या हातचं जेवण, आवडते मला जाम.
पाहताच___ला, जीव झाला येडापीसा,
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.
लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring,
आता माझ्या जीवनाचं,___च्याच हातात Steering.
शॉपिंगला जायला, तयार होते मी झट्कन,
___चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन.
क्रिकेटच्या मॅच मध्ये, धोनी ने मारली Six,
___ला केलं, मी सात जन्मांसाठी Fix.

अजून वाचा >> गृह प्रवेश मराठी उखाणे

वरील दिलेले उखाणे घेऊन तुम्ही आपल्या नातेमंडळींना इंप्रेस करा आणि तुमच्या जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात करा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्या.

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेले मराठी उखाणे आवडले असतील, जर का तुम्हाला या व्यतिरिक्त काही उखाणे माहीत असतील तर खाली कंमेंट मध्ये आम्हाला कळवा आम्ही ते या लेखात उपलब्ध करू.

Female (नवरीसाठी खास उखाणे)Male (नवरदेवासाठी खास उखाणे)
मॉडर्न उखाणे Male/FemaleFunny Marathi Ukhane
Traditional पारंपरिक उखाणेगृह प्रवेश Ukhane

Leave a Comment