तुम्ही गमतीदार विनोदी उखाणे शोधात आहात का? तर आम्ही घेऊन आलो आहोत भन्नाट विनोदी उखाणे जे सर्वांचे मनोरंजन करतील या लेखात तुम्हाला विविध प्रकारची Funny मराठी उखाणे मिळतील त्यांचा वापर करून तुम्ही सगळ्यांचे मनोरंजन करा.
Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे. |
Funny (Comedy) मराठी उखाणे
गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव, ___राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव.
हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ, ___रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ.
बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड, ___ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड.
बाजारातून घेऊन येतो __ ताजी ताजी, ___शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी.
हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू , ___ एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू.
गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू, ___चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.
लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी, त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी.
मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, ___ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय.
रेशमाच्या शर्ट ला, सोन्याच बटन, ___रावांना आवडत, बकऱ्याच मटण.
ताज्या ताज्या संत्र्याचा, गोड गोड ज्यूस, ___राव आहेत, एक नंबर कंजूस.
नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट, चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.
चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी, ___माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.
डास चावला की, येते अंगाला खाज, ___चे नाव घेतो, तुमच्यासाठी आज.
उन्हाळ्यात अंगाला, घाम येतो फार, आंघोळ कर___, नाहीतर लोकं होतील पसार.
आम्हाला खात्री आहे कि वरील भन्नाट विनोदी उखाणे तुम्हाला आवडली असतील हि उखाणे घेऊन तुमच्या नाते मंडळींचे मनोरंजन करा. या व्यतिरिक्त Funny Ukhane जर तुम्हाला माहिती असतील तर खाली Comment मध्ये आम्हाला कळवा आम्ही ते या लेखात उपलब्ध करू.