तुमचे नुकतेच लग्न ठरले आहे का? तर तुमच्यावर उखाणे घेण्याची वेळ येईल त्या साठी अगोदरच तयारी ठेवा, नववधू ने उखाणा घेतल्यावर वराने सुद्धा उखाणा घ्यावा यासाठी आग्रह केला जातो या लेखात आम्ही नवरदेवासाठी विविध प्रकारचे साधे, सोपे, गमतीदार उखाणे दिले आहेत. यातील तुम्हाला आवडलेला उखाणा द्या आणि तुमच्या जोडीदाराला आणि नातेमंडळीला आनंदीत करा.
Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे. |
Marathi Ukhane for Male (नवरदेवासाठी)
एक होती चिऊ आणि एक होता काऊ,
___च नाव घेतो, डोकं नका खाऊ.
निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे,
___च नाव घेतो, लक्ष द्या सारे.
आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा,
___च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल,
___च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा,
शोधून नाही सापडणार,___सारखा हिरा.
एका वर्षात, महिने असतात बारा,
___मुळे वाढलाय, आनंद सारा.
ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा,
___मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
हिरव्यागार मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
___ला पाहून, पडली माझी विकेट.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
___च्या रूपाने, झालो मी बेभान.
ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल,
___च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल.
दवबिंदूंनी चमकतो, फुलांचा रंग,
सुखी आहे संसारात, ___च्या संग.
हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू,
मी आहे लंबू आणि___किती टिंगू.
झुळूझुळू पाण्यात, हळू हळू चाले होडी,
शोभून दिसते सर्वांमध्ये, ___व माझी जोडी.
मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं,
माझं मन रोज नव्याने, ___च्याच प्रेमात पडतं.
सोन्याच्या कपावर, चांदीची बशी,
___समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी.
एक दोन तीन चार,
___वर आहे, माझे प्रेम फार.
चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ,
___चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ.
कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव,
___चे नाव घेतो, बंद करा टिव टिव.
डाळीत डाळ, तुरीची डाळ,
___च्या मांडीवर खेळवीन, एक वर्षात बाळ.
आंब्याला आहे, फळांच्या राजाचा मान,
___चे नाव घेतो, ऐका देऊन कान.
संध्याकाळच्या आकाशाचा, पिवळा-केशरी रंग,
___माझी नेहमी, घरकामात असते दंग.
उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ.
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,
___समोर माझ्या, सोण पण लोखंड.
छोटीशी तुळस, घराच्या दारी,
तूमची___, माझी जबाबदारी.
एक दिवा, दोन वाती,
___माझी, जीवन साथी.
नवरदेवाने वरील दिलेले उखाणे घेऊन आपल्या नातेमंडळींना इंप्रेस करावे आणि जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात करावी त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्या.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला नवरदेवासाठी दिलेले वरील मराठी उखाणे आवडले असतील, जर का तुम्हाला या व्यतिरिक्त काही उखाणे माहीत असतील तर खाली कंमेंट मध्ये आम्हाला कळवा आम्ही ते या लेखात उपलब्ध करू.