Haldi Kunku Special (हळदी कुंकू) Marathi Ukhane

तुम्ही हळदी कुंकू साठी उखाणे शोधात आहेत का? तर आम्ही घेऊन आलो आहोत हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे जे तुमचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम अगदी खास बनवेल चला तर जाणून घेऊया हळदी कुंकुवासाठीचे काही खास उखाणे.

मकर संक्राति उखाणेमंगळगौर मराठी उखाणे
वट पूर्णिमेसाठी उखाणे
Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

हळदी कुंकू स्पेशल उखाणे

चांदीच्या करंड्यात, ठेवले हळदी कुंकू,
__रावांना पाहताच, कुत्री लागतात भुंकू.
फुलांची वेणी, गुंफतो माळी,
___रावांच नाव घेते, हळदीकुंकवाच्यावेळी.
कान भरण्यात, बायका आहे हौशी,
___रावांच नाव घेते, हळदी कुंकुवाच्या दिवशी.
सासूबाई माझ्या प्रेमळ, नणंदबाई हौशी,
___रावांच नाव घेते, हळदी कुंकुवाच्या दिवशी.
हळदी कुंकुवाचे, निमंत्रण मिळाले काल,
___रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.
हळदी कुंकुवासाठी, जमल्या साऱ्या बायका,
___रावांचे नाव घेते, सर्वानी ऐका.
आजच्या कार्यक्रमासाठी, नेसली साडी मी छान,
___रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
वडिलांची माया, आणि आईची कुशी,
___रावांचे नाव घेते, हळदी कुंकुवाच्या दिवशी.
सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस खास,
___रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.
जास्वंदीच्या फुलांचा हार, शोभतो गणरायांच्या गळ्यात,
___रावांचे नाव घेते, सुवासिनीच्या मेळ्यात. 
भारत देश स्वतंत्र झाला, १५ ऑगस्टच्या दिवशी,
___रावांचे नाव घेते, हळदी कुंकुवाच्या दिवशी.
दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस,
___रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस.
हिरव्या हिरव्या रानात, चरत होते हरण,
___रावांचे नाव घेते, हळदी कुंकुवाचे कारण.
सौभाग्याचे अलंकार, मंगळसूत्राचे काळे मणी,
___राव आहेत, माझ्या कुंकुवाचे धनी.

आम्हाला खात्री आहे कि वरील हळदी कुंकू स्पेशल उखाणे तुम्हाला आवडले असतील हे उखाणे घेऊन हळदी कुंकुवाचा कार्यक्रम अगदी खास खरा.

या व्यतिरिक्त तुम्हाला हळदी कुंकुवाचे काही उखाणे माहित असतील तर आम्हाला Comment मध्ये कळवा आम्ही ते या लेखात उपलब्ध करू.

Leave a Comment