Modern Marathi Ukhane for Female/Male (मॉडर्न उखाणे)

तुम्ही मॉडर्न उखाणे शोधात आहेत का? तर आम्ही आज च्या पिढी साठी घेऊन आलो आहोत Modern Ukhane जे तुम्हाला आवडतील, हे मॉडर्न उखाणे घ्या आणि काळा नुसार स्वतःलाही अपडेट करा. या लेखात तुम्हाला अनेक प्रकाराची मॉडर्न उखाणे मिळतील जी पुरुष आणि स्त्रियांना हि वापरात येईल.

Female (नवरीसाठी खास उखाणे)Male (नवरदेवासाठी खास उखाणे)
Traditional पारंपरिक उखाणेFunny Marathi Ukhane
गृह प्रवेश Ukhane
Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

नव्या पिढीचे मॉडर्न उखाणे

माझं नाव घेताना___करते Blush,
Life मधले Tensions सारे, होणार आता Flush.
खेळत होतो PUBG , आला ब्लू झोन,
___चं नाव घेतो, शोधून सेफ झोन.
पाण्यात घागर बुडताना, आवाज येतो बुडबुड,
___आणि माझ्या Life मध्ये, नको कुणाची लुडबुड.
बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला,
___च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?
तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल,
___माझी आहे, खरंच कित्ती ब्युटीफुल.
रोज___म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस,
मग उखाणा घेताना___, कशाला गं खोटे खोटे लाजतेस?
Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले,
___आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले.
सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर,
___आहे, माझ्या Life चा Server.
कॅन्टीन, हॉटेलला ठोकला मी राम राम,
___च्या हातचं जेवण, आवडते मला जाम.
उखाणा घेते मी, खूपच Easy,
___राव असतात नेहमी, कामामध्ये Busy.
माझ्या___चा चेहरा, आहे खूपच हसरा,
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये विसरा.
लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा,
तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?
ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
___तू मला, सुपरवूमन वाटतेस.
माझ्या Life मध्ये,___भेटली Luckily,
कोणी काही बोलले तर, करते माझी वकिली.
शॉपिंगला जायला, तयार होते मी झट्कन,
___चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन.
यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली,
___आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली.
पाहताच___ला, जीव झाला येडापीसा,
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.
लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring,
आता माझ्या जीवनाचं,___च्याच हातात Steering.
दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते,
___च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते.
क्रिकेटच्या मॅच मध्ये, धोनी ने मारली Six,
___ला केलं, मी सात जन्मांसाठी Fix.
___सोहळ्याला सर्वजण झाले, आनंदाने जॉईन, 
___माझा हीरो, नी मी त्याची हिरॉईन.
उन्हाळ्यात हवा, गार गार ऊसाचा रस, 
___चाच विचार, माझ्या मनी रात्रंदिवस.
कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त, 
___च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त.
उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग, 
___माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग.
मंथ एन्ड आला की, भरपूर वाढते काम, 
ऑफिस मध्ये बॉस आणि घरी___कटकट करते जाम.
बिर्याणी हवी सारखी, नको वरण भात, 
___च्या हॉटेल प्रेमाने, पोटाची लागलीये वाट.

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे Modern Ukhane आवडले असतील हे उखाणे खास आजच्या पिढीसाठी आहेत. हे उखाणे वापरून काळानुसार अपडेट राहा आणि तुमच्या मित्र मंडळींना आनंदित करा.

या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही मॉडर्न उखाणे माहित असतील तर Comment मध्ये कळवा आम्ही ते या लेखात अपडेट करू.

Leave a Comment