तुम्ही मंगळगौर पूजेसाठी उखाणे शोधत आहेत का? तर आम्ही घेऊन आलो आहोत खास mangalgaur पूजेसाठी खास उखाणे जे अगदी साधे, सोपे आणि लक्षात राहतील असे आहे. चला तर जाणून घेऊया काही खास मंगळागौरी साठी काही खास उखाणे.
Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे. |
मंगळगौर मराठी उखाणे
जीवनाच्या प्रवासात कधी दुःखाच ऊन तर कधी सुखाचा पाऊस, ___रावांच नाव घेते सासूबाईंनी केली मंगळगौरीची हौस.
हिरव्यागार रंगाने, श्रावणात सुष्टी सजली, ___रावांच्या नावाने, मी मंगळागौर पुजली.
लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी, ___रावांचे नाव घेते, नेसून साडी चंदेरी.
मंगल गौरी-मंगल नाते, वंदन करते तुला, ___रावांना दीर्घायुष्य लाभो, हाच आशीर्वाद दे मला.
पूजेकरिता जमविल्या, नानविध पत्री, ___रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या रात्री.
मंगळागौरीचे व्रत करतात, सौभाग्यासाठी, ___रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांसाठी.
विवेकानंदांचे स्मारक, कन्याकुमारीच्या सीमेवर, ___रावांचे नाव घेते, मंगळा गौरीच्या वेळेवर.
मोत्याचा हार, गौराईच्या गळ्यात, ___रावांचे नाव घेते, सुवासिनीच्या मेळ्यात.
मंगळागौरीला वाढलाय, पावसाचा जोर, ___रावांचे नाव घेते, माझे भाग्यच थोर.
भर श्रावणात, पाऊस आला जोरात, ___रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या दिवशी ___च्या घरात.
सासर आहे छान, सासू आहे हौशी, ___रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या दिवशी.
श्रावणात बरसतात सरींवर सारी, मंगळागौरीच्या दिवशी ___रावांचे नाव घेते, मी सखी बावरी.
वरील मंगळागौरीचे उखाणे घेऊन तुमची मंगळागौर आनंदात जावो अशी आम्ही आशा करतो. या उखाण्यांनी तुमची मंगळागौर अगदी खास करा.
या व्यतिरिक्त तुम्हाला काही मंगळागौर मराठी उखाणे माहित असतील तर खाली Comment करा आम्ही ते या लेखात समाविष्ट करू.