Gruhpravesh Marathi Ukhane (गृह प्रवेश)

लग्न झाल्यावर जेव्हा मुलगी सासरी येते तेव्हा उखाणा घेतल्याशिवाय तिला सासरी मंडळी घरात प्रवेश करू देत नाही त्यासाठी तुम्ही अगोदरच उखाणे पाठ करून घ्या. आम्ही घेऊन आलो आहोत गृह प्रवेश उखाणे जे तुम्ही घेऊन गृह प्रवेश करू शकता आणि आपल्या सासरच्या मंडळींना इंप्रेस करा.

Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

गृह प्रवेश मराठी उखाणे

गुलाबाच्या झाडाला, फुले येतात दाट, ___
रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,
___रावांचे नाव घेते साथ जन्मासाठी.
इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात,
___रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते आत. 
सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात,
___रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
प्रेमळ लोकांना आवडते, लव्ह शायरी,
___रावांसोबत ओलांडते, मी घराची पायरी. 
नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले,
___रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.
जमले आहेत सगळे___यांच्या दारात,
___रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात.
हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट,
___रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड,
___च नाव घेतो, आता तरी वाट सोड.
रस्ता अडवायला, जमल्या सगळ्या बहिणी,
___ला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी?
मायेने वाढवले, संस्कारांनी घडवले, 
___चं नाव घ्यायला, ___नी अडवले.
त्यांचा नि माझा संसार होईल सुकर,
जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.
सुखी ठेवोत सर्वाना, ब्रम्हा, विष्णू, आणि महेश,
___रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
जमले आहेत सगळे, ___च्या दारात,
___रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.
___ची लेक झाली, ___ची सून,
___च नाव घेते, गृहप्रवेश करून.
शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात,
___रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात.
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात,
___रावांचे नाव घेते, ___च्या दारात.
लग्न झाले आता, आमची बहरू दे संसारवेल,
___रावांचे नाव घेते, वाजवून ___च्या घराची बेल.
रुपेरी सागरावर, चंदेरी लाट,
 ___रावांचं नाव घेते, सोडा माझी वाट. 

आम्हाला आशा आहे कि वरील गृह प्रवेश उखाणे तुम्हाला आवडली असतील हि उखाणे घेऊन मस्त सासरी Entry करा आणि नव्या पर्वाला सुरुवात करा.

या व्यतिरिक्त तुम्हाला काही गृहप्रवेश उखाणे माहिती असतील तर खाली Comment करा आम्ही ती या लेखात समाविष्ट करू.

Female (नवरीसाठी खास उखाणे)Male (नवरदेवासाठी खास उखाणे)
मॉडर्न उखाणे Male/FemaleFunny Marathi Ukhane
Traditional पारंपरिक उखाणे

Leave a Comment