Best Marathi Ukhane for Female (नवरीसाठी खास उखाणे)

तुमचे लग्न ठरले वाटत त्यासाठी अभिनंदन लग्न ठरले कि उखाणे अगोदरच पाठ करून ठ्यावे लागतात. या लेखात आम्ही नवरीसाठी विवीध प्रकारची साधी, सोपी, गमतीदार उखाणे दिली आहेत. यातील तुम्हाला आवडेल ती उखाणे घ्या आणि तुमच्या सासर च्या मंडळींना इंप्रेस करा.

Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

Marathi Ukhane for Female (नवरीसाठी)

आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून,
___रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून.
मुंबई आहे सर्वांच्या, स्वप्नांची नगरी,
 मी सुखी आहे कारण, ___राव पडले माझ्या पदरी. 
आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा,
___रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा.
चाफा बोलेना, चाफा चालेना,
___च माझ्याशिवाय, पानच हलेना.
 गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
___रावांचे नाव घेते___ची सून.
अरेंज म्यॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल, याची होती भिती,
परंतु ___रावांच्या येण्याने, बदलली माझी स्तिथी.
संत्री ला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज,
___आणि माझे झाले लव्ह मॅरेज. 
आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे,
___रावांसाठी, सोडून आले मी सारे. 
तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी,
___रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी. 
संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,
___रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष. 
नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,
___रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल. 
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
___रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.
मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार,
___रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.
दोन जीवांचे मिलन, जणू शतजन्मांच्या गाठी,
___रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहासाठी.
आतून मऊ, पण बाहेर काटेरी साल,
___दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
___रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने.
संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी,
___रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
साजूक तुपात, नाजूक चमचा,
___रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.
स्वप्नातला राजकुमार, आला घोड्यावर बसून,
___रावांचे नाव घेते, त्यांच्याच बाजूला बसून.
संसाराच्या सागरात, प्रेमाच्या लाटा, 
___रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.
चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा,
 ___रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.
आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार, 
___रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार. 
संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
___रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन. 
उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात___आणि___ची जोडी आहे जबरदस्त.

नवरीसाठी वरील दिलेले उखाणे घेऊन तुमच्या सासरच्या मंडळींना इंप्रेस करा आणि तुमच्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात करा.

आम्हाला आशा आहे कि तुम्ही वरील दिलेले उखाणे आवडले असतील जर का तुम्हाला या व्यतिरिक्त काही उखाणे माहित असतील तर कंमेंट मध्ये कळवा आम्ही ते या लेखात समाविष्ट करू.

Male (नवरदेवासाठी खास उखाणे)मॉडर्न उखाणे Male/Female
Funny Marathi UkhaneTraditional पारंपरिक उखाणे
गृह प्रवेश Ukhane

Leave a Comment