Makar Sankranti Special Marathi Ukhane

Makar Sankrant आली म्हणली कि उखाणे आलेच तर आम्ही घेऊन आलो आहोत संक्रांति स्पेशल मराठी उखाणे हे उखाणे एकदम साधे आणि सोपे असतील जे तुम्हाला लक्षात राहतील. हे उखाणे घेऊन तुमची संक्रांत अगदी खास करा.

हळदी कुंकू स्पेशल उखाणेमंगळगौर मराठी उखाणे
वट पूर्णिमेसाठी उखाणे
Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

मकर संक्राति उखाणे

रुसलेल्या राधेला, कृष्ण म्हणतो हास,
___रावांचे नाव घेते, संक्रांतीला खास.
हिमालय पर्वतावर, बरफाच्या राशि,
___रावांच नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी.
तिळाचा हलवा, चांदीच्या वाटीत,
___रावांच प्रेम, हेच माझ्या सुखाच गुपित.
माझ्या संसाराला, नजर ना लागो कुणाची,
___रावांचे नाव घेतेय, संक्रांती च्या दिवशी.
घरच्या दाराला, आंब्याच्या पानाचे तोरण,
___रावांचे नाव घेते, संक्रांतीचे कारण.
निसर्ग निर्मिती च्या वेळी, सूर्यनारायण झाले माळी,
___रावांचे नाव घेते, संक्रांतीच्या वेळी.
सासू आहे प्रेमळ, ननंद आहे हौशी,
___रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी.
मंगलकार्याची खून, म्हणजे दाराला तोरण,
___रावांचे नाव घेते, हळदी कुंकुवाचे कारण.
मोत्याची माळ, सोन्याचा साज,
___रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीचा सण आहे आज.
संसाररूपी सागरात, पती असावे हौशी,
___रावांच नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी.
सोसाट्याच्या वाऱ्याने, सगळीकडे उडते धूळ,
___रावांचे नाव घेते, आणि वाटते तिळगुळ.
तिळासारखा स्नेह, गुळासारखी गोडी,
___रावांच नाव घेते, सुखी असावी जोडी.
कपाळाच कुंकू, जसा चांदण्याचा ठसा,
___रावांचे नाव घेते, हळदी कुंकूवाला बसा.
तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान,
___रावांचे नाव घेऊन देते, संक्रांतीचे वाण.

आम्हाला आशा आहे कि वरील संक्रांति स्पेशल उखाणे तुम्हाला आवडले असतील, हे उखाणे घेऊन तुमची संक्रांत अगदी खास करा तुमच्या मैत्रिणींचे मनोरंजन करा.

या शिवाय तुम्हाला काही उखाणे माहित असतील तर आम्हाला Comment मधे कळवा आम्ही ते या लेखात उपलब्ध करू.

Leave a Comment