तुम्ही वट पूर्णमेसाठी उखाणे शोधत आहात का? तर आम्ही घेऊन आलो आहोत खास वट पूर्णिमेसाठी स्पेशल उखाणे. हे उखाणे घेऊन तुमची वट पूर्णिमा अगदी खास होईल चला तर जाणून घेऊया काही खास, सोपे व लक्षात राहतील असे उखाणे.
Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे. |
वट पूर्णिमेसाठी उखाणे
शहा जहानने मुमताजसाठी, बांधला महाल ताज, ___रावांचे नाव घेते, वटपौर्णिमा आहे आज.
फुलांच्या बागेत, फुलली मोहक शेवंती, ___राव सुखी राहावेत, हि परमेश्वराला विनंती.
वटपौर्णिमा आहे खरं तर, सुवासिणींसाठी मोठा सण, ___रावांनी जिंकले, पहिल्याच भेटीत माझे मन.
वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते साथ, ___रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ.
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी, ___रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या दिवशी.
खाण तशी माती, ___राव माझे पती, आणि मी त्यांची सौभाग्यवती.
वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग, ___राव सोबत असताना, धरतीही वाटे स्वर्ग.
तांदुळाला इंग्लिश मधे म्हणतात राईस, ___राव आहेत माझी पहिली चॉईस.
वडाची पूजा करते, वटपौर्णिमेच्या दिवशी, ___रावांसाठी दिर्घायुष्य मागते संपूर्ण सोबती.
वटपौर्णिमेला भरते, सुवासिनींची ओटी, ___रावांचे नाव, सदा माझ्या ओठी.
वटपौर्णिमेला आहे वादाचे महत्व, ___रावांची वाढो किर्ती आणि महत्व.
वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करावे, पती म्हणून ___राव जन्मो जन्मी मिळावे.
आम्हाला खात्री आहे कि वरील वटपौर्णिमेचे स्पेशल उखाणे तुम्हाला आवडले असतील हे उखाणे घेऊन तुमची वाट पौर्णिमा अगदी खास बनवा.
या व्यतिरिक्त तुम्हाला काही वटपौर्णिमेचे उखाणे सुचत असतील तर खाली Comment मधे कळवा आम्ही ते या लेखात उपलब्ध करू.