तुम्ही Traditional उखाणे शोधात आहात का? तर आम्ही घेऊन आलो आहोत पारंपरिक उखाणे जे कित्येक काळा पासून स्त्रिया वापरत आल्या आहेत तुम्हाला ही उखाणे आवडतील चला तर जाणून घेऊया हि पारंपरिक उखाणे.
Note – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे. |
Traditional (पारंपरिक उखाणे)
कन्या होते माहेरी, आता सून झाले सासरी, ___रावांसारखे पती मिळाले, भाग्यवान मी खरी.
माहेरी साठवले, मायेची मोती, ___च नाव घेऊन, जोडते नवी नाती.
राजवर्खी बांगडी, मागे पुढे केरवा, ___रावांच्या जीवावर, मी शालू नेसते हिरवा.
नवे घर, नवे लोक, नव नवी नाती, संसार होईल मस्त, ___राव असता सोबती.
पौर्णिमेच्या दिवशी, चंद्र उगवला ढगात, तुमचे आशीर्वाद असूदेत, ___रावांची किर्ती पसरो जगात.
लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने, ___रावांच्या जीवावर मी राहते मानाने.
कमळात उभी लक्ष्मी, मोरावरती सरस्वती, ___रावांच नाव घेते खरी मी भाग्यवती.
पाण्याच्या हंड्यावर, फुलाच झाकण, ___रावांच्या हातात, सोन्याचा झाकण.
माझा नमस्कार फुकाचा, तुमचा आशीर्वाद लाख मोलांचा, ___रावांचं नाव घेते, संसार होवो सुखाचा.
चोहोकडे लावल्या चार समया, मधे पसरले आसन, ___राव बसले पूजेला, लक्ष्मी झाली प्रसन्न.
मी होते मळ्यात, चंद्र होता तळ्यात, ___रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधते गळ्यात.
समुद्राला आली भरती, नदीला आला पूर, ___रावांच्या साठी, मी माहेर केले दूर.
आत जाते बाहेर जाते, दुपारचा वाजला एक, ___रावांच नाव घेते, ___ची लेक.
नको मोती, नको चंद्रहार, ___रावांच नाव, हाच मला खरा अलंकार.
आम्हाला खात्री आहे कि तुम्हाला हि पारंपरिक उखाणे आवडली असतील या व्यतिरिक्त तुम्हाला काही पारंपरिक उखाणे माहित असतील तर आम्हाला खाली कंमेंट मधे कळवा आम्ही ती या लेखात समाविष्ट करू.